पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून, बाया-बापड्यांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याने सोमवारी सकाळी (दि.७) महिला व ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाºयांना घेराव घालत जाब विचारला. मात्र पदाधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सविता शेळके, ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे, संजय शेळके, रवींद्र शेळके, मारुती नेहरे, समाधान घुसळे, आनंदा शेळके, शिपाई उत्तम पिंपरकर यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेत निषेध व्यक्त केला. जोपर्यंत ठोस आश्वासन देऊन पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. येवल्याचे सहायक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ व महिलांनी आंदोलन मागे घेत पदाधिकाºयांची सुटका केली. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विहिरीचे काम पूर्ण करावे यासाठी ग्रामपंचायत व ठेकेदारास वारंवार सांगूनही काम केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी सरपंच सविता शेळके, उपसरपंच कचरू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, मारु ती नेहरे, समाधान घुसळे, ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांच्यासह पदाधिकाºयांना घेराव घालत ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्याशी फोनवर चर्चा करून मार्ग काढण्यास विनंती केली. शेख यांनी ग्रामस्थांशी याबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत पदाधिकाºयांची सुटका केली. या आंदोलनात सिंधूबाई नेहरे, गीताबाई भवर, जया जाधव, केशरबाई खरात, अंजनाबाई पवार, जिजाबाई घुसळे, शकुंतला खुरासाने, ताराबाई वाणी, शोभाबाई जाधव, उज्ज्वला पिंपरकर, अनिता वाणी, मीरा शिंदे, जिजाबाई शेळके, विनता जाधव, परिघाबाई शिरसाठ, रंभाबाई शेळके, स्वाती यादव, अनिता शेळके, मंगला शेळके, अर्चना जाधव, हौशाबाई शेळके, परिघाबाई यादव, मंगल मोरे, सीताबाई शेळके, भगवान नेहरे आदींसह महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ठाणगावला पदाधिकाऱ्यांना कोंडले पाटोदा : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा सरपंच, ग्रामसेवकावर रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:00 AM
पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून, बाया-बापड्यांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
ठळक मुद्देपदाधिकाºयांना घेराव घालत जाब विचारलापाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन