मालेगाव : येथील हृदयसम्राट प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या महाराजा सयाजीराव राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा हॉटेल मराठा दरबार येथे झाली. राज्यातील ४९ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन म. स. गा. महाविद्यालायाचे प्राचार्य दिनेश शिरुडे, सतीश कलंत्री, चंद्रशेखर बेंडाळे, सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार यांच्या हस्ते झाले. विजेत्या स्पर्धकांना पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विजयालक्ष्मी आहिरे, पं. स.चे माजी उपसभापती अनिल तेजा, देवा पाटील, तुषार चांदवडकर, संजय हिरे आदिंच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. वक्तृत्त्व स्पर्धेचे हे ९वे वर्ष आहे. वैयक्तिक स्तरावर घेतली जाणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा असल्याचे संयोजक तुषार शिल्लक यांनी सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण रविराज सोनार व अंकुश मयाचार्य यांनी केले. कार्यक्रमाला महेश अहिरे, समाधान शिंपी, सागर रौन्दल, राहुल मोरे, अमोल सोनवणे आदी उपस्थित होते.
--------------------------
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक व हृदयसम्राट करंडक शैलेश कोंडस्कर (महात्मा फुले कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, पनवेल), व्दितीय - आश्विनी टाव्हरे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे), तृतीय - प्रसाद जगताप (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे), चतुर्थ - सारांश सोनार (डॉ. बाबासाहेब विधी महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), उत्तेजनार्थ - मुग्धा थोरात (फर्ग्युसन कॉलेज, पुणे), मंदार लटपटे (परभणी), अक्षय इळके (छत्रपती शिवाजी विद्यापीठ, इचलकरंजी), चंचल पवार (जि. प. शाळा, दहिवाळ), वर्षा जाधव (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे), गार्गी चांदवडकर (डी. बी. इंग्लिश मीडियम स्कूल, चांदवड)
फोटो फाईल नेम : १६ एमएसईपी ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव येथील हृदयसम्राट प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत सतीश कलंत्री, तुषार शिल्लक, देवा पाटील, भागचंद तेजा, विजयालक्ष्मी अहिरे, रविराज सोनार आदी.
160921\16nsk_1_16092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.