कळवण येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व धोंडू लक्ष्मण कोठावदे यांचा तो नातू असून सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सुपरवायझर असलेल्या प्रदीप धोंडू कोठावदे व नाशिक महापालिकेतील शिक्षिका जयश्री कोठावदे यांचा प्रतीक मुलगा आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये बेंगलोर व भोपाळ येथे झालेल्या या दोन्ही परीक्षांसाठी सुमारे सात लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील तीन हजार विद्यार्थी इंडियन आर्मीसाठी तर दोन हजार शंभर विद्यार्थी इंडियन नेव्हीसाठी पात्र ठरले. या दोन्ही परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, दोन्ही परीक्षेत देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रतीकने नावलौकिक मिळविला आहे. विशेष म्हणजे या परीक्षांचा अभ्यास करतांना त्याने कुठेही क्लास लावलेला नव्हता.
त्याचे माध्यमिक शिक्षण नाशिकच्या रचना विद्यालयात व उच्च माध्यमिक शिक्षण आरवायके महाविद्यालयातून झाले. १२ वी विज्ञानमध्ये शिकत असतांनाच त्याने गुणांकन मिळविल्यामुळे पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. बी.टेक. करीत असतांनाच अंतिम वर्षाच्या आठव्या सेमिस्टरमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नाशिकहूनच अभ्यास पूर्ण करावा लागला. लहानपणापासून स्पर्धा परीक्षा देण्याबाबत उत्सुक असलेल्या प्रतीकने या लॉकडाऊन काळात वरील दोन्ही परीक्षांची तयारी सुरू केली. आई व वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्याने अभ्यासक्रम सुरू करीत कुठेही क्लास लावला नाही. तरीदेखील या दोन्ही ठिकाणी लेफ्टनंट म्हणून त्याने देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याच्याशी व कुटुंबातील घटकांशी संवाद साधला असता तो दोन्ही परीक्षेत अव्वल आलेला असून त्याची इंडियन नेव्हीमध्येच जाण्याची इच्छा आहे.त्यादृष्टीने तो लवकरच केरळ येथे प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
110221\11nsk_14_11022021_13.jpg
===Caption===
प्रतिक कोठावदे