जय बाबाजी भक्त परिवाराने महाराष्ट्रातील आपल्या विविध आश्रमाच्या इमारती कोविड सेंटरसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. श्रीक्षेत्र वेरूळ येथील भक्त निवासही कोविड सेंटरसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तेथील भक्त निवासाची पाहणी आमदार प्रशांत बंब यांनी केली. याप्रमाणे ओझर येथील आश्रमात नव्याने बांधण्यात आलेली इमारत देखील कोविड सेंटरसाठी देण्याचा मनोदय स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला. आश्रमाच्या या इमारतीची पाहणी ओझर प्रशासनाने नुकतीच केली. यावेळी अध्यात्म शिरोमणी श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज, आश्रमाचे प्रवक्ते विष्णू महाराज,ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास पाटील, ओझर मर्चंटचे संचालक भालचंद्र कासार, आश्रमाचे व्यवस्थापक जनार्दन शिंदे, अनिल आहेर आदी उपस्थित होते.
इन्फो
नागरिकांना मिळणार दिलासा
निफाड तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण असलेल्या ओझर येथील वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब होत आहे. त्यामुळे येथे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर व्हावे अशी ओझरच्या ग्रामस्थांची मागणी होती. आता ओझरच्या जनार्दन स्वामी महाराज आश्रमाने नव्याने बांधलेली इमारत कोविड सेंटरसाठी देण्याचे ठरवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फोटो- १० ओझर जनार्दन
ओझर येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाची इमारत.
===Photopath===
100521\10nsk_11_10052021_13.jpg
===Caption===
फोटो- १० ओझर जनार्धनओझर येथील संत जनार्धन स्वामी आश्रमाची इमारत.