नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वातून मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व नाशिक महानगरपालिका यांच्या समन्वयातून विभागीय क्रीडा संकुलातील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे संपूर्ण १८० ऑक्सिजन बेड्स व १०५ सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासमवेत केली.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहर अभियंता संजय घुगे, मनपा प्रकल्प संचालिका डॉ. कल्पना कुटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,कविता कर्डक,आंबदास खैरे, समाधान जाधव, गौरव गोवर्धने यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संकटाशी सामना करण्यासाठी शासनास मदत व्हावी, अशी संकल्पना भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडली. त्यानुसार विभागीय क्रीडा संकुलातील स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे संपूर्ण १८० ऑक्सिजन बेड्सचे नाशिक शहरातील कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. तसेच या कोविड सेंटर मध्ये १०५ सीसीसी बेडस राहणार आहेत. येत्या दोन दिवसांत हे कोविड सेंटरदेखील नागरिकांच्या सेवेत समर्पित केले जाणार आहे.
------------
फोटाे
११ठाकरे कोविड सेंटर