शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

त्र्यंबकमध्ये कोव्हीडचा कहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:38 PM

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.

ठळक मुद्दे१६५ पॉझिटिव्ह : आजपासून ह्यमोतीवालाह्ण ची टीम त्र्यंबकेश्वरमध्ये

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.जिल्हा परिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण ३९२ होते आता ४२७ आहे. तर नगरपरिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आता ३६२ आहेत.ग्रामीण भागातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी त्र्यंबकेश्वरच्या घराघरात सर्वेक्षण मोहीम सुरु करुन पॉझिटिव्ह रुग्ण अंजनेरी शिवारात ब्रम्हाव्हॅली नजीक निसर्गाच्या सान्निध्यातील ट्रेकींग विश्राम गृह येथे दाखल करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तेथे कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. इतक्या दिवस जागाच मिळत नव्हती आता येथे दोन मोठे हॉल असुन बुधवारी तेथे ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.रविवार पासुन गावातर्फे जनता कर्फ्यु आठ दिवस पाळण्यात येत आहे. याशिवाय दर शनीवारी रविवारी जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच संचारबंदी लागु केलेली आहे. त्यात त्र्यंबकेश्वर मंदीरही बंद ठेवले आहे.सध्या तालुक्यातील रुग्ण संदीप फाउंडेशन येथे डीसीएचसी उपचार केले जातात. शहरातील सर्वसाधारण रुग्ण कोव्हीड केअर सेंटर अंजनेरी येथे ठेवले जात आहे. आता त्र्यंबकमधील रुग्ण संख्या १० ते २० संख्येने वाढत असुन ही बाब चिंताजनक आहे.दरम्यान पालिकेने आता शहराच्या सर्वच भागात सॅनिटायझरची फवारणी सुरु केली आहे. पण कोव्हीडची शृंखला तोडणे गरजेचे आहे. कारण रुग्ण वाढले की त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात येतात. त्र्यंबकेश्वर, हरसुल, अंजनेरी येथील ॲन्टीजेन रॅपिडचे स्वॅब थेट ५०/६० होतात. त्यांच्यातून निम्याहून अधिक पॉझिटिव्ह असतात. ही शृंखला तोडणे गरजेचे आहे.वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. भागवत लोंढे, अंजनेरी येथील प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, स्व शहरी ग्रामीण आरोग्य कर्मचारी आदी कोरोना कोव्हीड योध्दे काम करत आहे.शहरात पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे कोरोनाची लक्षणे संशय आल्यास गावातील सधन परिस्थितीतील रुग्ण थेट नाशिक येथील मोठी हॉस्पिटल गाठतात. तेथे स्वॅब देण्याऐवजी लगेच एमआरआय काढला जातो. आणि लगेच आयसीयुमध्ये दाखल करुन उपचार सुरु करतात. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह असे कर्मचा-यांना माहित पडत नाही.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरcorona virusकोरोना वायरस बातम्या