पेठ : येथील डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बीडकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मान्यवर म्हणून समीक्षक तथा प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, जिल्हा क्र ीडाधिकारी रवींद्र नाईक, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, संचालक श्रावण म्हसदे, राजेश क्षत्रिय, प्राचार्य राजेंद्र जाधव, भूषण बागुल, प्राचार्य डॉ. आर. बी. टोचे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. नरेंद्र पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी संजय जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. यात चायनीज, चाट भांडार, कोल्ड्रिंक्स, झुणका भाकर, ज्यूस सेंटर, पाणीपुरी, मिसळपाव यांचा समावेश होता. आनंदमेळ्यात विविध खेळ व मनोरंजनाचे उपक्र म घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, रांगोळी, हस्तकला, मेहंदी, पुष्पप्रदर्शन, वादविवाद स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा प्रकारात लिंबू-चमचा, संगीतखुर्ची, स्त्रीच्या कपाळावर टिकली लावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणेश नृत्य, आदिवासी नृत्य व अनेक मराठी-हिंदी गीतांवर नृत्य सादर केले. तसेच विविध समाजप्रबोधनात्म नाटिका सादर केल्या. विविध वेशभूषा करून फान्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेचे शोधनिबंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, मोनाली रिपोर्टे यांनी सूत्रसंचालन केले. मोहिनी पगार यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सुनील शिंदे, गोरख शेवाळे, संविधान सोनावणे, प्रा. पूजा जंगम, दिनेश हळदे, रोहिदास बोबडे, गणेश शिरसाठ, वाणी सी. बी. सैंदाणे, प्रशांत निकम, गणेश मोरे, के. बी. निकम, एम. पी. जाधव, कुणाल शिरसाठ, पूनम कोळी, जनार्दन सातपुते आदींनी परिश्रम घेतले.
डांग सेवा मंडळ संचलित बीडकर महाविद्यालयात क्र ीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:07 AM