नाशिक : ‘गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्ह्या बाळा’, ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’, ‘नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई’ यांसह विविध श्रीकृष्ण गीतांनी शहर आणि परिसरातील मंदिरे दुमदुमून गेली होती. शुक्रवारी (दि. २३) रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिला भाविकांनी पाळणा तसेच भजने सादर केलीकापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गायक नंदकुमार देशपांडे आणि विद्यार्थ्यांचा स्वरगंगा हा कार्यक्रम, रात्री ११ वाजता अजित महाराज यांचे संतजन्माचे कीर्तन झाले. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.रात्री ९.३० वाजता मोहन उपासनी प्रस्तुत वेणूनाद हा बासरी वादनाचा कार्यक्रम झाला. तसेच रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. आंतरराष्टÑीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वृंदावन कॉलनी द्वारका येथील श्रीकृष्ण मंदिरात शनिवारी (दि. २४) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ६.३० सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. तर रविवारी (दि. २५) सायंकाळी ७ वाजता नंदोत्सव कार्यक्रम होणार आहे. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात मूर्तीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली.दरम्यान, जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचनांसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.कृष्ण मंदिरात पविते पर्वमहानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंदिरांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मौजे सुकेणे येथे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जन्माष्टमीपर्यंत देवाला पविते वाहण्यात आले. याप्रसंगी पंथाचे आचार्यप्रवर महंत सुकेणकर शास्त्री यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व वर्णन केले.श्री गुरूगंगेश्वर वेद मंदिरात सोहळाश्री गुरूगंगेश्वर वेद मंदिर त्र्यंबकरोड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठानतर्फे स्वरणिम ग्रुप प्रस्तुत ‘शरण तुला’ गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गायक पांडुरंग दळवी, नरेश ठाकूर, प्रणव भार्गव, डॉ. मनीषा जोशी यांचे गायन रंगले.चतु:शास्त्रीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्टच्या वतीने श्री योगेश्वर श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंचवटीतील सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता वैद्य गुरुजींचा मंत्रजागर कार्यक्रम संपन्न झाला.
नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:20 AM