नाशिक : ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष कृष्णराव वाईकर (८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे.डॉ. वाईकर यांचा जन्म २३ जानेवारी १९३२ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्टÑकार्याचे संस्कार झाले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊन अनेकदा तुरुंगवासही भोगला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी नाकारून समाजकार्यात झोकून दिले. कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. संत गाडगेबाबांनी त्यांना कुष्ठपीडितांसाठी काम करण्याची सूचना केली. त्यानुसार वर्धा व वेल्लोर येथे कुष्ठपीडितांवरील उपचारांचे प्रशिक्षण घेतले. सन १९५० पासून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण मंडळाचे कार्य सुरू केले. मंडळाचे ते प्रारंभापासूनच कार्यवाह होते. डॉ. वाईकर यांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्यांनी आयुष्यभर गरजूंना मागदर्शन केले. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह, तर महाराष्टÑ ज्योतिष परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते. सातारा येथे १९५५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ज्योतिषशास्त्र संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कृष्णराव वाईकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:04 AM