नाशिक : के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रसेवा योजनेद्वारे महाविद्यालयीन विभागाकरिता मतदार नोंदणी मोहीम उपक्र म घेण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आदि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्र म घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. बी. जे. भंडारे यांनी मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले.राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. कल्पना अहिरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार अर्ज भरण्याचे मार्गदर्शन करून ५०० अर्ज भरून घेण्यात आले. याप्रसंगी हर्षदा मोराडे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
के.टी.एच.एम. महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम उत्साहात
By admin | Published: October 05, 2016 2:15 AM