नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाउनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमातील मुलांना व साकूर फाटा येथील मूक-बधिर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले.कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक गरीब, अनाथ मुलांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्यासाठी ‘एक हात मदती’चा पुढे केला. संपूर्ण गावातून १०० ते १५० किलो तांदूळ जमा करून सदर धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमातील अनाथ व गरीब मुलांना वाटप करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातील काही धान्य इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथे असलेल्या मूक-बधिर संस्थेतील मुलांना वाटप केले आहे. कुºहेगाव ग्रामस्थांनी सदर धान्य वाटप करत असताना सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत मुलांना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, मास्क लावून विशेष काळजी घ्यावी याविषयी जनजागृती केली. शिवसेनेचे शाखाप्रमुख अंबादास धोंगडे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर धोंगडे, भाऊसाहेब तांबे, रामदास गायकवाड, शिवाजी धोंगडे आदी उपस्थित होते.
कुºहेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला ‘एक हात मदतीचा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:56 PM
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाउनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमातील मुलांना व साकूर फाटा येथील मूक-बधिर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले. को
ठळक मुद्देउपक्रम : गावातून संकलित केलेले धान्य वाटप