नाशिक : हॉटेलमध्ये जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर रक्कम अदा केली नाही, म्हणून मित्रांकडून बियरच्या बाटल्याने हल्ला चढविण्यात आल्याची घटना सातपूरमध्ये घडली तसेच मित्राला मारहाण केली म्हणून चार तरूणांनी रस्ता अडवून दुचाकीस्वारास लाकडी दंडुक्याने मारहाण करण्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधितांविरूध्द प्राणघातक हल्ले केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुषार अशोक बोरसे (१९, रा.अमृतधाम) हा युवक दुचाकीवरून मित्र प्रमोद बाळू चारोस्करसोबत जात असताना वनदेवी सोसायटीसमोर टकलेनगर येथे संशयित सौरभ दिलीप हिरे (१९, रा.अमरधाम वखार), चंद्रप्रकाश राजेश गढवाल (१९, रा. वृंदावननगर आडगाव), अपुर्व विनायक कटारे (२१, रा. द्वारका), अनिकेत चंद्रमोरे या चौघांनी अडवून दमबाजी करत शिवीगाळ केली. यावेळी हिरे याने स्वत:जवळ असलेला लाकडी दंडुका काढत चारोस्क रच्या डोक्यात मारला. तसेच उर्वरित संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बोरसे यास मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत चारोस्कर व हिरे जखमी झाले असून बोरसे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरूध्द प्राणघातक हल्ला व शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हिरे , गढवाल, कटारे यांना पोलिसांनी अटक केली असून चंद्रमोरे हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक इंगोळे करीत आहेत.दुसऱ्या घटनेत सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात मित्रांनी एकत्र जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर हॉटेलचे बिल भरण्यावरून वाद होऊन संशयित उत्तम बाबुराव (३७, रा. मुंगसरा), दिपक रोकडे (२८, रा. जेलरोड), पवन फडोळ (२८,रा. मुंगसरा) यांनी फिर्यादी संपत निवृत्ती बंदावणे यास मद्याच्या रिकाम्या बाटल्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी बंदावणे याने सातपूर पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द तक्रार दिली असून पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करत तीघा संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक पाटील करीत आहेत...तरी गुन्हे सुरूचशहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा ‘विश्वास’ नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आऊट’सारखी मोहिम पुन्हा हाती घेतली आहे. तरीदेखील शहरात हाणामारीच्या घटना घडतच आहे.
कुरापत : सातपूर, पंचवटीत प्राणघातक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 4:30 PM
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा ‘विश्वास’ नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आऊट’सारखी मोहिम पुन्हा हाती घेतली आहे.
ठळक मुद्दे टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला