नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक प्रकाश वाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.न्या. नरेंद्र चपळगावकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून, ते वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वीही प्रतिष्ठानच्या कार्याशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे. नाटककार, नाट्य समीक्षक आणि पत्रकार जयंत पवार यांची अनेक नाटके प्रसिद्ध असून, त्यांनी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती समितीतही काम केलेले आहे. १५व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषिवले असून, त्यांना २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अॅड. अजय निकम हे नाशिकच्या सांस्कृतिक सामाजिक कार्याशी निगडित असून, प्रतिष्ठानच्या कार्यात सहभाग असतो. सिन्नर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाजे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याशी निगडित असून, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळावरील नियुक्त्या जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 2:00 AM
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक प्रकाश वाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देन्या. चपळगावकरांसह पवार, वाजे, निकम यांचीही निवड