शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लासलगावी शेतमालाचे लिलाव सुरू

By admin | Published: November 18, 2016 11:06 PM

शेतकऱ्यामंध्ये समाधान : पहिल्याच दिवशी लाल कांद्याला १६३१ रुपये भाव

लासलगाव : चलन तुटवड्यामुळे गेल्या सप्ताहभरापासून बंद असलेले येथील कांदा लिलावासह शेतमालाचे लिलाव शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. लिलावात लाल कांद्याला १६३१, तर उन्हाळ कांद्याला ९४५ रुपये सर्वाधिक भाव जाहीर झाला.येथील उन्हाळ कांद्याची आवक १९० ट्रॅक्टर/पिकअप झाली. उन्हाळ कांद्याला किमान भाव ४०० रुपये, तर सर्वाधिक भाव ९४५ रुपये मिळाला. सर्वसाधारण भाव ७६० रुपये होता.लाल कांद्याची आवक ११० ट्रॅक्टर/ पिकअपमधून झाली.लाल कांद्याला किमान भाव ५०० रुपये, कमाल १६३१, तर सर्वसाधारण भाव १३०० रुपये होते.सोयाबीनला किमान भाव २७००, कमाल भाव २८६१, तर सर्वसाधारण भाव २८३० रुपये होता. गेल्या सप्ताहभर शेतमालाचे लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मका : किमान भाव ११३१, कमाल भाव १२४४, तर सर्वसाधारण भाव १२३० रुपये होते. बाजरी : किमान भाव १२५२, कमाल १९८०, तर सर्वसाधारण भाव १७२० रुपये होते. हरभरा : किमान भाव ७३०१, कमाल ७४०० रुपये होता. मूग : किमान भाव ३०००, कमाल भाव ४५००, तर सर्वसाधारण भाव ४४०० रुपये होते.लासलगाव येथील मुख्य आवारावरील शेतमालाचे लिलाव शुक्र वारी पूर्ववत झाल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी ज्याच्या नावावर बॅँकेचे खाते आहे त्याच्या पासबुकची झेरॉक्स तसेच सदर बॅँकेच्या आयएफसी कोडसह सदर शेतमाल विक्र ीसाठी आणावा. तसेच विक्रीनंतर रक्कम धनादेशाने अगर एनएफटीच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात येईल, असेही होळकर यांनी सांगितले.केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर लासलगावसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलाव मंगळवारपर्यंत (सात दिवस) बंद राहिल्याने कोट्यवधींचे लिलाव ठप्प झाले होते. ते पूर्ववत सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)