सुरगाणा : मागणी करूनही रेशनकार्ड मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील असंख्य कुटुंबांना मागणी करूनही रेशनकार्डची मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याआधी ४७८ कुटुंबाना रेशनकार्ड देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. म्हणून मे महिन्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात ५९२ कुटुंबांचे अर्ज देण्यात आले. यावेळी देखील केवळ आश्वासन देण्यात आले. रेशनकार्ड मिळण्याची मुदत संघटनेच्या वतीने देण्यात येऊन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुका अध्यक्ष राजू राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:20 AM