खामखेडा : अवकाळी पावसामुळे शेतातील कामे खोळंबल्याने खामखेडा परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत असल्याने परगावच्या मंजुराकडून कामे करुन घेतली केली जात आहेत.चालू वर्षी सतत पंधरा दिवस झालेल्या पाऊसामुळे शेता पाणी साचल्याने ते लवकर कमी झाले नाही. या अवकाळी पाऊसामुळे शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. आता शेतातील पाणी कमी झाले आहे. तेव्हा शेतातील मका बाजरी याची कापणी करणे. त्याचे शेतातील गवत साफ करणे आदी कामे चालू आहेत.काही शेतकऱ्यांनी पावसाच्या आदी मका व बाजरी पिकाची कापणी केलेली होती. त्यांनी आता शेतातील मका व बाजरीचे व कडबा आवरला गेला असून ते कांदा लागवडीच्या तयारीत आहेत. कारण त्यांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे उशिरा टाकली होती. ती आता लागवडीसाठी तयार झाली आहेत.पुर्वी बागयती शेती मोजक्या असल्याने गावातील स्थानिक मंजुराकडून शेतीचे काम केली जात असे. काही वेळेस स्थानिक मजुराही कामे मिळत नसे. मात्र वीज आणि पीव्हीसी पाईपामुळे नदीपात्राचे पाणी शेतीसाठी उपयोगात आल्याने बागयती शेतीचा विकास झाला. शेती सपाटीकरण्यासाठी अत्याधुनिक अवजारे आली. त्यात जेसीबी यंत्रा सारखे शेती सपाटीकरण विकसित झाल्याने उंच सखल भाग सपाट झाल्याने बागयती शेतीचे प्रमाण वाढले.आता अनेक रिक्षा व टॅक्सी व टेम्पोवाले यांनी मजुरांची टोळीच्या संपर्कात असल्याने ते साहजिकच मजुर उपलब्ध करून देतात. तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्याशी संपर्क करावा लागतो. ते परगावातील मजूर कामासाठी घेऊन येतात. सकाळी लवकर उठून मजुरांच्या गावी जाऊन अनतात. काही तेथील स्थानिक वाहनवाले लवकर सकाळी दहा वाजेपर्यत शेतात सोडतो व सायंकाळी पाच वाजेपर्यत कामे करीतात. आणि पुन्हा सायंकाळी घरी सोडतात. म्हणजे हे मजूर सकाळी सात वाजता घराबाहेर निघुन पुन्हा सायंकाळी सात वाजता घरी जातात. हा वाहनचालक मजूर ज्या शेतकºयाने सांगितले असते त्याच्याकडे मजूर पोहोचविले जातात.(फोटो २५ खामखेडा)खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड करतांना.
खामखेडा परिसरात मजूर टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:30 PM
खामखेडा : अवकाळी पावसामुळे शेतातील कामे खोळंबल्याने खामखेडा परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत असल्याने परगावच्या मंजुराकडून कामे करुन घेतली केली जात आहेत.
ठळक मुद्दे उंच सखल भाग सपाट झाल्याने बागयती शेतीचे प्रमाण वाढले.