येवला : एस टी महामंडळाचे येवला आगारप्रमुख यांच्यावर शासकीय निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटूनही दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.एस टी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की येवला आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांचेवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला, त्या इसमाच्या हातात जीवघेणी हत्यारे होती. आगारप्रमुख यांच्यावर झालेला हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेमुळे अधिकारी कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष, सचिव व कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहे.
येवला आगार प्रमुखावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची कामगार सेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 7:02 PM
येवला : एस टी महामंडळाचे येवला आगारप्रमुख यांच्यावर शासकीय निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटूनही दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देत्या इसमाच्या हातात जीवघेणी हत्यारे होती.