शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:33 AM

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसललेविद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. कंत्राटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन कायदेशीर असल्याचे आणि कुणीही कायदा हातात घेतला नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना कारवाई थांबवावी लागली. असे असले तरी शुक्रवारी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी याप्रकरणी चर्चा होणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. गेल्या एक तारखेपासून आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी रोजगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी उपोेषणकर्त्यांची भेट घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाºयांप्रकरणी तोडगा निघेल असे वाटत असतानाच कुलसचिव, प्रशासन अधिकारी आणि विधी अधिकाºयांनी परस्पर जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. विद्यापीठाने अचानक भूमिका बदलल्याने कंत्राटी कर्मचारी संभ्रमात असून, विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त करीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्र्धार केला. मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, पोलिसांचा फौजफाटा तसेच अतिक्रमण विभागाच्या वाहनासह आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आंदोलन बंद करावे, असे उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी कॉम्रेड श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. भूषण साबळे यांनी पोलिसांना आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे सांगत आंदोलनाचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याने पोलीस नरमले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी कॉमे्रड श्रीधर देशपांडे यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी याप्रकरणी चर्चा करून निर्णय घेण्याचा तोडगा काढला.देशपांडे यांच्या गाडीला अपघातआंदोलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाट्यासह आल्याचे समजताच कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे महात्मानगर येथून आंदोलनाच्या ठिकाणी येत असताना कुलकर्णी गार्डनजवळ त्यांची गाडी दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. त्यांना किरकोळ इजा झाली. यावेळी त्यांनी उपचार न करता गाडी तेथेच सोडून उपोषण स्थळ गाठण्यास प्राधान्य दिले.