सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे परिसरातील तपमानात वाढ झाली आहे. सावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेत. दररोज या परिसरातून हजारो लिटर दूध डेअरींना पाठवले जाते. त्यामुळे दर दहा दिवसांनी या भागात लाखो रुपयांचे चलन फिरते. याशिवाय हा भाग कांद्याचे आगार समजला जातो. पाणीटंचाईचे सावट असल्यामुळे दुभत्या जनावरांचा वैरणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेल्या दोन पैशातून विहिरीत आडव्या कूपनलिका, नवीन विहिरी, उभ्या कूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आडात नाही तर पोहºयात कुठून येणार? विहिरी खोदण्यासाठी परप्रांतीय लोक आले आहेत. चार ते पाच हजार रु पये फूट या दराने खोदकाम चालू आहे. आडव्या कूपनलिका पन्नास रु पये, तर उभ्या कूपनलिकेचा दर साठ रुपये आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र, राजस्थान या राज्यांतील लोकांना सुगीचे दिवस आले आहेत. एवढे प्रयत्न करूनही पाणी मात्र लागत नाही. त्यामुळे मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा वाया जात नाही. तात्पुरता उपाय म्हणून गिरणा डॅम परिसरातून ओला चारा मागवत आहेत. पण तोही किती पुरणार? जून महिन्यापर्यंत जनावरे जगवायची आहेत. त्यामुळे मोठे आव्हान शेतकºयांपुढे उभे आहे. मातीमोल भावात जनावरे विकावी लागत आहेत. कोट्यवधी रुपयांचे पशुधन वाचवायचे असेल तर आत्तापासून काही उपाययोजना केल्या पाहिजेत. मुळातच हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. पाऊस पडावा म्हणून या परिसरात असलेल्या हजारो हेक्टर परिघाच्या पठारावर वनखात्याने वृक्षलागवड केली पाहिजे. समतल चर, वनतळे, नालाबांध आदी कामे हाती घेतली पाहिजेत. यामुळे पाणी जमिनीत मुरून पाणलोट क्षेत्र वाढेल. या भागात मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या आहे, लांडगे व कधी बिबट्यांचे दर्शन घडते, त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. झाडी धरणात चणकापूर कालव्याद्वारे पाणी टाकणे प्रस्ताावित आहे. पाच-सहा कि.मी. कालव्याचे काम बाकी आहे, ते येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचे हाल : विहिरींची पाणीपातळी खालावली सावकारवाडीत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:24 AM
सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला.
ठळक मुद्देसावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेतकूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न