-डॉ. अतुल अहिरराव, सिक्स सिग्मा हॉस्पिटल
------
आमच्याकडे कोविड रुग्णालय सुरू केले. ऑक्सिजन बेडची सर्व व्यवस्थादेखील आहे. मात्र, गत पाच दिवसापासून खूप प्रयत्न करूनही ऑक्सिजनच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना ऑक्सिजन बेडच उपलब्ध करून देणे अशक्य झाले आहे.
डॉ. मनीष कासट, आयएमए हॉस्पिटल
--------
आम्ही जिल्हा प्रशासन आणि स्थानिक वितरकांकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील दररोज निम्मा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत अनेक रुग्ण बरे झाले तरी ऑक्सिजनची शाश्वती नसल्याने ऑक्सिजन बेड लागणारे नवीन रुग्ण दाखल करून घेण्यात अडचणी येत आहेत.
डॉ. ज्ञानेश्वर थोरात, शताब्दी हॉस्पिटल
--------
आमच्याकडेदेखील सातत्याने ऑक्सिजनबाबत अनिश्चितता सुरूच आहे. मागणीच्या तुलनेत केवळ ६० टक्केच ऑक्सिजन मिळत आहे. सध्या तर केवळ उपलब्ध रुग्णांना पुरेल इतकाच साठा असल्याने नवीन रुग्ण दाखल करणेदेखील बंद केले आहे. ही उणीव लवकरात लवकर दूर व्हायला हवी.
डॉ. प्रसाद मुगळीकर, सीओओ, अपोलो हॉस्पिटल