गणेशोत्सवात येणाºया गौरी तथा महालक्ष्मींच्या साडीचोळी व अलंकार खरेदीसाठी नाशिककरांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केली. माहेरी आलेल्या गौरी तथा महालक्ष्मींना साडीचोळी करण्यासाठी नाशिककरांनी शहरातील विविध साड्यांच्या दुकानातून खरेदीवर भर दिल्याने मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली आहे. गौरींसाठी लागणाºया दोन्ही साड्या व अलंकार सारख्याच दर्जाच्या असाव्यात यासाठी महिलांनी कटाक्षाने लक्ष देऊन खरेदी करतानाच अगदी गौरींप्रमाणेच स्वत:साठीही साड्यांची खरेदी केली. गौरींसाठी प्रामुख्याने काठापदराच्या सिल्क साड्यांची अधिक खरेदी झाली असून, यात एक ते दोन हजार रुपये किमतीच्या साड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. या साड्या प्रसाद म्हणून महिला स्वत:साठी वापरतात. त्यामुळे अनेकांनी पाच ते दहा हजार रुपयांच्या साड्याही खरेदी केल्या. यात मध्यमवर्गीय गटानी तीन ते सात हजार रुपयांच्या साड्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जेरीस आलेल्या कापडबाजाराला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गौरींच्या, महालक्ष्मींच्या साडीचोळीसोबतच महिलांनी स्वत:साठीही जोरदार खरेदी केल्याने बाजारात नवचैतन्य निर्माण झाले. गौरींचे महत्त्व, कौतुक हे माहेरी आलेल्या मुलींच्या कौतुकासारखेच असते. घरात त्यांच्या आगमनाची नुसती लगबग सुरू असते. घरोघरच्या लेकी, सुना या आपल्या माहेरवाशिणींसाठी स्वागताला सज्ज होतात आणि मनोभावे प्रेमाच्या पायघड्या घालतात. गौराईच्या मानपानात, घाईगर्दीत काही कमी व्हायला नको म्हणून घरातल्या थोरामोठ्यांसह सर्वच काळजीपूर्वक सारेकाही मनापासून करवून घेतात. तसेच गौरार्इंना लागणाºया सारख्याच दर्जाच्या साड्या व दागिन्यांसह स्वत:साठी वस्त्रालंकारांची खरेदी करणाºया महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने साडी विक्रेत्यांचा चांगलाच व्यवसाय झाला.
माहेवाशिणींना साडीचोळी; कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:05 AM