नाशिक : वारकरी साहित्य परिषद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे होणाºया सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण लहवितकर महाराज यांची निवड करण्यात आली आहे.१५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान हे संमेलन होणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून डॉ.रामकृष्णदास लहवितकर हे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. यावेळी महाराष्ट्रातील संत परंपरा, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती आदी विषयांवर परिसंवाद होणार आहे. खुली भजन स्पर्धादेखील पार पडणार आहे. या संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले उपस्थित रहाणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.दिंडी सोहळ्याचा शुभारंभ पशुसंवर्धन,दुग्ध,मत्सविकास कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी उपस्थितांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वारकरी विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्यांच्या संस्थेचे सरचिटणीस जनार्दन बोथे हा पुरस्कार स्वीकारणार आहे. यासोबत संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी बापूसाहेब देशमुख यांना जीवनगौरव,विशेष कार्य पुरस्कार बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवणीकर यांना देण्यात येणार आहे .सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणार पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना ५१ हजार रु .रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाध्यक्षपदी लहवितकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 6:12 PM
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे होणाºया सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण लहवितकर महाराज यांची निवड
ठळक मुद्देगोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे होणाºया सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण लहवितकर महाराज यांची निवड गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून डॉ.रामकृष्णदास लहवितकर हे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील