शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम

By संकेत शुक्ला | Published: July 05, 2024 4:37 PM

निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत.

नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नामसाधर्म्याचा फायदा घेत लाखभर मते घेणाऱ्या दिंडोरी येथील बाबू सदू भगरे यांनी संपूर्ण निवडणुकीसाठी फक्त २० हजार रुपये खर्च केला आहे. खर्च सादर करण्याच्या शेवटच्या मुदतीत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा खर्च दाखविण्यात आला आहे, तर नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येक एक उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेपेक्षाही त्यांचा निवडणुकीचा खर्च कमी झाल्याचे त्यात दिसून येते. नाशिक लोकसभेत सर्वाधिक खर्च माजी खासदार हेमंत गोडसे यांनी (८६ लाख दोन हजार ११३) केला आहे. त्यांच्यासाठी पक्षाने ४५ लाखांचा खर्च केला आहे. राजाभाऊ वाजे यांना एकूण ८३ लाखांची देणगी मिळाली, त्यापैकी ८० लाख ८८ हजार रुपये निवडणुकीत त्यांनी खर्च केला आहे.

शांतिगिरी महाराजांनी २२ लाख दहा हजार रुपये खर्च केले. सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी १९ लाख पाच हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘बाबू भगरे पॅटर्न’ एक लाख ९ हजार मतांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची मते कमी झाली. परंतु, त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. या मतदारसंघातील माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनी ७५ लाख १४ हजार रुपये खर्च सादर केला आहे, तर खासदार भास्कर भगरे यांनी ६२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे. 

दोघांवर गुन्हे दाखल...

दिंडोरी मतदारसंघाच्या निवडणुकीत देणगी स्वीकारताना तसेच खर्च करताना रोखतेची मर्यादा न पाळल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मालती ढोमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नाशिक मतदारसंघातील उमेदवार भाग्यश्री अडसूळ यांनी खर्चच सादर न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४