न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे हजारो भाविक शनिचरणी नतमस्तक झाले. यावेळी शनिदेवाला पावसासाठीही साकडे घालण्यात आले.तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे कधी नव्हे इतकी प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांब वाहने लावून भाविकांना पायी जावे लागले. वाहनांची संख्या व गर्दीचे अवलोकन केले असता लाखभराहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. वयोवृद्ध जाणकारांच्या मते आजवर भरलेल्या यात्रांपैकी यंदाच्या यात्रेत हजेरी लावलेल्या भक्तांची संख्या प्रचंड दिसून आली. दरम्यान शनिदेवाची दुपारची महाआरती भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, जनरल सेक्र ेटरी माजी आमदार अनिल अहेर, यात्रा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद अहेर, समाधान पाटील आदी उपस्थित होते. आरती नंतर संस्थानच्या वतीने मोफत खिचडीचे वाटप करण्यात आले.ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वीस वर्षांपासून आरोग्य सेवा देणारे जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील डॉ. पी. जी. पिंगळे यांनी मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती. आरोग्यसेवेमुळे दोन रुग्णांचे प्राण वाचले तसेच प्रचंड गर्दी असतानाही संस्थानचे शिस्तबद्ध नियोजन व पोलिसांनी केलेला चोख बंदोबस्त त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावर्षी पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झालेली आहे. त्यामुळे यात्रोत्सवास शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने दिसून आला. अनेकांकडून शनिदेवापुढे पावसासाठी साकडे घालण्यात आले.
लाखो भाविक शनिचरणी नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:48 AM
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे हजारो भाविक शनिचरणी नतमस्तक झाले. यावेळी शनिदेवाला पावसासाठीही साकडे घालण्यात आले.तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे कधी नव्हे इतकी प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांब वाहने लावून भाविकांना पायी जावे लागले. वाहनांची संख्या व गर्दीचे अवलोकन केले असता लाखभराहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन ...
ठळक मुद्देनस्तनपूर : गर्दीचा उच्चांक,पावसासाठी साकडे