ओझरटाऊनशिप : बनावट नोंदणी क्रमांक देऊन लकी ड्रॉ योजना चालवून योजनेचे सभासद झालेल्या ७२ जणांकडून १३ हप्त्यात तीन लाख ५२ हजार ८०० रुपये जमा करून त्यांना लकी ड्रॉची कुठलीही वस्तू अथवा पैसे परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी सात जणांविरुद्ध ओझर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी राकेश खंबोरे, सचिन धामुर्डे, सागर कदम, सुनील गांगोडे, नितीन मासूळ, सलमान सय्यद, काशीनाथ सताळे यांनी संगनमत करून जय जलाराम एंटरप्रायझेस नावाने लकी ड्रॉ योजना बनावट नोंदणी क्रमांक देऊन शासनास कोणताही विक्री कर न भरता ओझर बाजार पेठ सुरू केली. अश्पाक शेख यांच्या दुकानात व खंडेराव महाराज यात्रा मैदानात लकी ड्रा योजना चालवून खोप गोपीनाथ संपत वाघमारे, रा. पंचशीलनगर, ओझर यांच्यासह ७२ जणांकडून १३ हप्त्यांमध्ये प्रत्येकी ४९०० प्रमाणे एकूण तीन लाख ५२ हजार ८०० रुपये जमा करून त्या मोबदल्यात लकी ड्रॉमधील कुठलीही वस्तू न देता अथवा पैसे परत न करता सभासदांची फसवणूक केली. अशी तक्रार गोपीनाथ वाघमारे यांंनी ओझर पोलिसांत केली आहे़ (वार्ताहर)
गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक
By admin | Published: March 12, 2016 11:02 PM