पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी गोळा करून तब्बल १५ लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यांत उभा केला. तालुक्यातील वाडी वस्तीवरील सामान्य जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व उपचारांच्या सुविधा असलेली रुग्णवाहिका खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली. यामुळे कोरोना कालावधीसह कायमस्वरूपी ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सदैव उपलब्ध असणार आहे.
पेठ पंचायत समिती आवारात शुक्रवारी ( दि. ४ ) विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर ,तहसीलदार संदीप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, अमित भुसावरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, गोकुळ झिरवाळ,नामदेव हलकंदर, गिरीश गावीत, शिक्षक संघटना समन्वय समितीचे मनोहर टोपले, मोतीराम सहारे, आर. डी. शिंदे, राजेंद्र भोये, धनंजय चव्हाण, भारत भामरे, उत्तम चौधरी, संजय भोये, दिनकर डगळे, किरण नाठे, चंद्रशेखर पठाडे यांच्यासह पेठ तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेकडून गौरव
पेठसारख्या छोट्या व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी १५ लाखांचा कोरोना निधी जमा करून रुग्णवाहिका भेट दिल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक समन्वय समितीचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, वैशाली वीर, नम्रता जगताप, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे आदी उपस्थित होते.
फोटो - ०५ पेठ ॲम्बुलन्स
पेठ तालुक्यातील शिक्षकांच्या मदतनिधीतून रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, विलास अलबाड, पुष्पा पवार, डॉ. संदीप आहेर, संदीप भोसले आदी उपस्थित होते.
===Photopath===
050621\05nsk_3_05062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ पेठ ॲम्बुलन्स