येवला : येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरु ड यांची फेरनिवड झाली आहे.पंचायत समितीचे माजी उपसभापती रु पचंद भागवत यांनी आवर्तन पद्धतीने मुदतपूर्व मिहनाभर अगोदरच राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गेल्या महिन्यात गरु ड यांनी उपसभापती पदावर यापूर्वीच निवड झाली होती.दरम्यान उपसभापतीची मुदत संपल्याने सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी ३१ डिसेंबरला पंचायत समिती सभागृहात सभा संपन्न झाली.२१ डिसेंबरला सभापती पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण निघाले होते. त्यानुसार येवला पंचायत समिती सभापती पदासाठी या प्रवर्गातून एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान हि जागा निरंक राहिली. त्यामुळे सभापती पदाची निवड झाली नसल्याने निवड पुढे ढकलली.या सभेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील. अनुसूचित जमाती राखीव पुरु ष गटाला संधी दिली गेल्यास प्रवीण गायकवाड हे एकमेव अनुसूचित जमाती (पुरु ष) उमेदवार ठरून त्यांना संधी मिळू शकते. येवला पंचायत समितीत सेनेचे ७ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य असे संख्याबळ आहे. सभापती निवडीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. उपसभापती पदासाठी सेनेच्या लक्ष्मीबाई गरु ड व राष्ट्रवादीच्या वतीने मोहन शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात लक्ष्मीबाई गरु ड विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रोहिदास वारु ळे यांनी कामकाज पाहिले.येवला पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. दरम्यान, गरु ड यांची फेरनिवड जाहीर होताच पंचायत समितीच्या वतीने नवनिर्वाचित उपसभापती गरु ड यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिवसेना नेते संभाजी पवार, सभापती कविता आठशेरे, गटविकास अधिकारी उमेशकुमार देशमुख, सदस्य रु पचंद भागवत, मोहन शेलार, प्रविण गायकवाड, ?ड. मंगेश भगत, आशा साळवे, नम्रता जगताप, अनिता काळे, सुनीता मेंगाणे, बाळासाहेब पवार, शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे, कांतीलाल साळवे, ?ड. बापूसाहेब गायकवाड, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
उपसभापतीपदी लक्ष्मी गरु ड यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:05 PM