दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.नाशिक जिल्हांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी हि सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांतर्गत या बसेस धावत आहे.माञ बस स्टँडवर शुकशुकाटच दिसत आहे.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. खबरदारी म्हणून चाकरमाने आपआपल्या वाहनाने नोकरीच्या ठिकाणी ये -जा करतात तर सर्व सामान्य नागरिक बस सेवा सुरू झाली तरी देखील भिती पोटी प्रवास करायला तयार नाही.आगारातून बाहेर पडणाऱ्या सर्व बसेस सॅनिटाइज करण्यात येत असून, एका बसमधे केवळ २२ प्रवासी प्रवास प्रवास करू शकतील. व कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे बस वाहक यांनी सांगितले.एसटी ची मालवाहतूक सुरूअगोदरच तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी महामंडळाने माल वाहतूक सुरू केली आहे. विभागीय नियंत्रक नितीन मैद यांनी विविध व्यावसायिक आस्थापनांना भेट देत मालवाहतुकीसाठी बस उपलब्ध असल्याचे सांगत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत असून बस आता मालवाहतूक करताना दिसू लागली आहे.
प्रवाशांविना धावतेय ग्रामीण भागात लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 3:21 PM
दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात एसटीची मालवाहतूक सुरू