रावतेसाहेबांना सद्बुद्धी दे’ : चालक-वाहकांकडून एसटी बसचे पूजन
नाशिक : लालपरी तू का रुसली..., रावतेसाहेबांना सद्बुद्धी दे... असा फलक शहरातील बसचालक-वाहकांनी स्थानकावर तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या ‘लालपरी’ला लावला अन् ‘बसच आमची लक्ष्मी आहे’ असे सांगत कर्मचाºयांनी लक्ष्मीपूजनाच्या औचित्यावर बसचे पूजन केले.सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तिसºया दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सणासुदीच्या काळात चालक-वाहकांसह प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संपामुळे संपात सहभागी कर्मचाºयांना दिवाळी साजरी करणेदेखील मुश्कील झाले आहे. संपूर्ण राज्यात एसटीची चाके रुतली असून, राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मोडून पडला आहे. दरम्यान, शहरात दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीने ‘गांधीगिरी’ करत बस कर्मचाºयांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. दोन दिवसांपासून शांततेत संपात सामील झालेल्या कर्मचाºयांच्या संयमाचा बांध गुरुवारी काहीसा सुटल्याचे पहावयास मिळाले. बस कर्मचाºयांनी स्थानकात माती लावून अभ्यंगस्नान करण्यापासून तर चक्क बसपुढे अगरबत्ती लावून श्रीफळ वाढवून पूजा करण्यापर्यंतचे अभिनव आंदोलन पहावयास मिळाले.जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन पदरात पडत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका महाराष्टÑ राज्य एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी घेतलीआहे.त्याचप्रमाणे सरकारनेदेखील राज्य कर्मचाºयांप्रमाणे एसटीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. एकूण दोघांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असून ,‘यात आमचा दोष काय...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे लांब पल्ल्याची बस वाहतूक आणि शहर बससेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. सणासुदीच्या काळात गजबजून जाणारी बसस्थानके ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, एन.डी. पटेल रस्त्यावरील आगारामध्ये चालक-वाहकांनी बसपुढे नारळ फोडून ‘लालपरी तू का रू सली’ असा प्रश्न उपस्थित केला आणि ‘साहेबांना’ सद्बुद्धी दे’ अशी याचना बसरुपी लक्ष्मीकडे केली.