लासलगाव : येथील बाजार समितीत कांदा गोणी लिलावात ११९६५ गोणीतील ५९८७ क्विंटल तर विंचुर उपआवारावर आवक वाढुन २५ हजार क्विंटल कांदा लिलाव झाला.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्र वारच्या तुलनेत आवकेमध्ये अल्पशी वाढ झाली असून दरात लाल कांदा शंभर ते दीडशे रु पयांची वाढ झाली. उन्हाळ कांद्याच्या दरात तीनशे ते चारशे रु पयांची वाढ झाली आहे.विंचुर येथे २२६ वाहने भरून कांदा विक्र ीस आणल्याने वाहने बाजारात समितीचे बाहेर प्रवेश करण्याकरीता गर्दी करून प्रतिक्षेत उभी होती.दिवसभरात विंचुर येथील लिलावात पंचवीस हजार क्विंटल लाल कांदा ९०० ते १५०० व सरासरी १३०० तर उन्हाळ कांदा १००० ते १७०० व सरासरी १५०० रू. भावाने विक्र ी झाला.लासलगाव बाजार समितीत व्यापारी आडमुठे धोरण राबवत गोणी लिलाव करीत असल्याने विंचुरपेक्षा लासलगाव येथे केवळ वीस टक्केच कांदा गोणी विक्र ी झाली. कांदा गोणी संख्या वाढली असली तरी ती फारसी समाधानकारक नाही.मात्र अवघ्या पाच किलोमीटरअंतरावर विंचूर उपबाजार आवारावरखुल्या पद्धतीने कांद्याचा लिलावासाठी कालपेक्षा दोनशे वाहने कांदा आवक वाढली आहे. लासलगाव बाजार समितीत सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी बारदाण गोणी आवक वाढली आहे. बारदाण गोणीमुळे लासलगाव येथील बारदाण शिलाई काम करणार्या महिला कामगार यांच्या ठप्प झालेल्या रोजगारास चालना मिळाली आहे. बारदान विक्र ी करणारे विक्र ेते यांना जागा देऊन रास्त दरात नवीन बारदान विक्र ीस उपलब्ध करून दिले आहे.
लासलगावी ५९८७ क्विंटल कांदा गोणी लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:49 PM