नाशिक : सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी शेतकºयांनी भूसंपादनास सकारत्मकता दर्शविली असून, त्या संदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली.माळेगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योगासाठी जमिनीची निकड असल्याने या औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे १४६ हेक्टर जमीन त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जमीनमालक शेतकºयांची बैठक घेण्यात आली. सिन्नरचे प्रांत अधिकारी महेश पाटील व औद्योगिक विकास महामंडळाच्या हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकºयांनी जागा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. आगामी काळात जमिनीच्या मोबदल्याची रक्कम ठरेल.
माळेगाव वसाहतीसाठी भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:13 AM