--------------
देवस्थानाचा वाद
नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण व विहीतगाव येथे बालाजी देवस्थानाला शासनाने एकेकाळी दिलेल्या जमिनी वर्षानुवर्षे शेतकरी कसत असून, या जमिनींचे रेल्वेसाठी खरेदी केल्यास मूळ जागा मालक देवस्थानाला त्याचा मोबदला कायद्याने दिला जाईल. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, अशी जागेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला राज्य सरकारनेही सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे दाेन्ही गावांच्या शेतकऱ्यांनी जागा मोजणीस विरोध केला आहे.
चौकट-=====
अशी आहेत रेल्वे मार्गातील गावे
* नाशिक- देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसरी, नानेगाव
* सिन्नर- वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, पाट प्रिंप्री, बारगाव प्रिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी, मुळसगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी बु., दोडी खु., नांदुरी, नांदुरशिंगोटे.