शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

४८ हजार मिळकतदारांवर घरपट्टीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:39 AM

नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील संभाव्य वीस हजार मिळकती असण्याची शक्यता गृहीत धरून ही मुदतवाढ पुढील महिन्याअखेरपर्यंत देण्यात आली आहे. दरम्यान, महासभेने सदोष सर्वेक्षणामुळे नोटिसा थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आत्तापर्यंत १२ हजार मिळकतदारांच्या नोटिसा रोखण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तथापि, ज्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्या रद्द करण्यात आल्या नसल्याने ४८ हजार मिळकतदारांच्या डोक्यावर शास्तीसह वाढीव घरपट्टीची टांगती तलवार कायम आहे.महापालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेने जीओ इन्फोसीस या कंपनीला काम दिले आहे. या कंपनीने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केल्यानंतर सुमारे ६० हजार मिळकती या विनाघरपट्टी आढळून आल्या होत्या. त्यानंतर सुमारे ३ लाख ३० हजार मिळकतींचे सर्र्वेक्षण करण्यात आले. त्यातील २ लाख ६९ हजार मिळकतींवर बेकायदेशीर अथवा मंजूर नकाशाच्या पलीकडे बांधकाम करण्यात आल्याचे आढळले होते. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती शासनामार्फत न्यायालयाला पाठविल्यानंतर त्यावरून बरीच भवती न भवती झाली होती. त्यानंतर अगोदरच्या ६० हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सर्वेक्षणच सदोष असल्याचे आढळल्याने महासभेत प्रशासनाला तोंडघशी पडावे लागले होते.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका