नाशिक : वन खात्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या; परंतु वापरात नसलेल्या जमिनी मूळमालकांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी अत्याचार विरोधी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. समितीने म्हटले आहे की, राज्य सरकारने स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर हजारो एकर जागा वन खात्यासाठी संपादित केल्या, परंतु त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही व संपादित केलेल्या सर्वच जागांचा उपयोगही वन खात्याने केलेला नाही. ज्या जागा वन खात्याच्या उपयोगात आलेल्या नाहीत त्या जागा मूळमालक किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत करण्यात याव्यात तसेच काही धनदांडगे व जमीनदार अशा जागा बळकावून आदिवासी, मागासवर्गीयांवर अन्याय करीत असल्याने त्यांना अटकाव घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राहुल तुपलोंढे, अविनाश अहेर, मुकुंद गांगुर्डे, दिगंबर शेळके, शिवाजी गायकवाड, मनोहर दोंदे आदि उपस्थित होते.
वनखात्याच्या जमिनी मूळमालकाला मिळाव्यात
By admin | Published: January 13, 2015 11:53 PM