नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यामुळे जिल्'ात रेशनचे धान्य वाहतूक करण्याचा निर्माण झालेला पेच सुटत नसल्याने मे महिन्यासाठी मंजूर झालेल्या धान्यापैकी जवळपास वीस हजार क्विंटल धान्याची मुदतीत वाहतूक न होऊ शकल्याने सदरचे धान्य तूर्त व्यपगत झाले असून, त्याचा फटका ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. धान्य वाहतुकीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरटीओच्या मदतीने २७ मालट्रक सक्तीने ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्'ातील रेशन व्यवस्था धान्य वाहतूकदाराअभावी कोलमडून पडली असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी आजवर तीन वेळा धान्य वाहतुकीसाठी जाहीर निविदा मागविण्यात आल्या; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एकीकडे वाहतूकदाराची समस्या, तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना मुदतीत धान्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान पाहता, गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आपला विशेष अधिकार वापरून आरटीओच्या माध्यमातून काही खासगी वाहने अधिग्रहीत केले होते मात्र गुदामातून इच्छितस्थळी धान्य वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खासगी वाहतूकदारांनीही नकार दिला होता. त्यामुळे महिन्याकाठी ८० हजार क्विंटल धान्य वाहतूक करताना प्रशासनाची दमछाक होऊन त्यापैकी ६० टक्केधान्याची वाहतूक १५ मेपर्यंत होऊ शकली. परिणामी २० हजार क्विंटल धान्याची उचल न झाल्याने ते व्यपगत झाले, त्याचा थेट परिणाम शिधापत्रिकाधारकांवर होणार आहे. मात्र व्यपगत होऊ पाहणाऱ्या धान्याची उचल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
रेशनचे २० हजार क्विंटल धान्य व्यपगत
By admin | Published: May 19, 2015 1:18 AM