घरातील बेडरूममध्ये ठेवलेला लॅपटॉप, चार्जर, हेडफोन आणि मोबाईल असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत दत्तात्रय दर्शन रो हाऊस येथे राहणाऱ्या अशोक भोळे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी अज्ञात चोरट्याने भोळे यांच्या बंद रो हाऊसचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत हॉलमध्ये व बेडरूममध्ये ठेवलेल्या वस्तू चोरल्या. काही दिवसांपासून म्हसरूळ, आडगाव परिसरात चोरट्यांनी रो हाऊस लक्ष करत घरफोडी करण्याचे प्रकार सुरूच ठेवल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
---
म्हसरूळला ट्रकचालकाला लुटले
पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ दुचाकीवरून आलेल्या चौघांनी ट्रक अडवून ट्रकमध्ये चढून चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यातील पाच हजार रुपयांची रोकड, मोबाईल तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स लुटून नेल्याचा प्रकार रविवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे.
याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघा संशयित आरोपींविरुद्ध लूटमार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या लूटप्रकरणी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे राहणाऱ्या राजेंद्र पंढरीनाथ बेनके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल दुपारी तीन वाजता बेनके ट्रक घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठजवळच्या रंगून धाब्याजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या २० ते २५ वयोगटातील चौघांनी ट्रक थांबवून त्यातील तिघेजण ट्रक मध्ये चढले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत जबरीने रोकड, मोबाईल व अन्य वस्तू काढून पोबारा केला.
----