शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

काच फोडून  कारमधून लॅपटॉपची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:29 AM

कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, दागिने, मोबाइल वा पैसे चोरून नेण्याच्या घटना शहरात सुरूच आहेत़ त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.

नाशिक : कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, दागिने, मोबाइल वा पैसे चोरून नेण्याच्या घटना शहरात सुरूच आहेत़ त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.  निफाड तालुक्यातील कोठुरे येथील रहिवासी मुकुंद मोगल हे मित्र चेतन अहेरसोबत बुधवारी (दि़१९) कामानिमित्त नाशिकला आले होते़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली रेनॉल्ट कार (एमएच १५, ईबी ७५७६) त्र्यंबक रोडवरील महिंद्र शोरूमच्या बाजूला पार्क करून जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते़ जेवणानंतर ते कारजवळ आले असता त्यांना उजव्या दरवाजाची काच फोडलेली व त्यातील महागडा लॅपटॉप, बँक आॅफ महाराष्ट्राचे व एचडीएफसी बँकेचे एकूण चार चेकबुक चोरट्यांनी चोरून नेले होते़महिलेस ठार मारण्याची धमकीदिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील रहिवासी शिल्पा संसारे यांच्या घराचा दरवाजा वाजवून दोन संशयितांनी शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित आकाश दत्तू पवार व कुणाल वसंत म्हसदे (रा.वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिंडोरीरोड) या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ट्रकच्या बॅटऱ्या चोरीअमृतधाम परिसरातील साईनगर सोसायटीतील रहिवासी शरद टेमगर यांच्याा घरासमोर पार्क केलेल्या मालट्रकच्या (एमएच १५ एफव्ही ७०८३) १६ हजार रुपये किमतीच्या बॅटºया शुक्रवारी (दि़७) संशयित अनिल मोतिलाल वर्मा (रा.मारुती वेफर्ससमोर, तपोवन) याने चोरून नेल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे़लॅपटॉपसह, संगणकाची चोरीशरणपूररोडवरील रवि चेंबरमध्ये असलेल्या बॉश सिक्युरिटी एजन्सीच्या आॅफिसमधून संशयित धारा तायडे व तिचा भाऊ मंगेश तायडे यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी दहा हजार रुपयांचा लॅपटॉप व दहा हजार रुपयांचा संगणक चोरून नेल्याची फिर्याद प्रशांत काळे (जाणता राजा कॉलनी, पंचवटी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़आॅनलाइन रोलेट खेळणाºया दोघांना अटकमोबाइलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून आॅनलाइन रोलेट जुगार खेळविणाºया दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ सादिक खान सैफखान पठाण (रा.पखालरोड) व परवेज जुबेर शेख (रा.नाईकवाडीपुरा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत़ फाळकेरोड परिसरात दोन युवक नागरिकांकडून आॅनलाइन जुगारावर पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि़२१) दुपारी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता पठाण व शेख हे मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून रोलेट जुगार खेळताना तसेच खेळविताना आढळून आले. या दोघांकडून १ हजार ५०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी