विदेशी कंपनीकडून बनवण्यात येणारा व्हिजा मोफत तयार होतो. जर इराकच्या कंपनीला भारतीय मजदूर पाहिजे असतील, तर ते आपल्याकडे काम करणाऱ्या भारतीय व्यक्तीकडून पाच नावे घेतात. ते कर्मचारी भारतात आपल्या दलालांना संपर्क साधून पाच पासपोर्ट तयार करून घेतात. कंपनी त्याच पासपोर्टवर व्हिजा तयार करून घेते. या सर्व प्रक्रियेत एक रुपया खर्च येत नाही; मात्र भारतीय दलाल एक ते दीड लाख रुपये नागरिकांकडून वसूल करतात. विदेशात पाठवणारे दलाला मोठ-मोठी स्वप्नं दाखवून पाठवतात. एजंटद्वारे जो पगार सांगितला जातो त्या उलट पगार युवकांना मिळतो. त्याच बरोबर अतिशय दुय्यम दर्जाचे काम त्यांना करावे लागते. व्हिजासाठी मोठी रक्कमविदेशी कंपनीकडून बनवण्यात येणारा व्हिजा मोफत तयार होतो. जर इराकच्या कंपनीला भारतीय मजदूर पाहिजे असतील, तर ते आपल्याकडे काम करणाऱ्या भारतीय व्यक्तीकडून पाच नावे घेतात. ते कर्मचारी भारतात आपल्या दलालांना संपर्क साधून पाच पासपोर्ट तयार करून घेतात. कंपनी त्याच पासपोर्टवर व्हिजा तयार करून घेते. या सर्व प्रक्रियेत एक रुपया खर्च येत नाही; मात्र भारतीय दलाल एक ते दीड लाख रुपये नागरिकांकडून वसूल करतात. विदेशात पाठवणारे दलाला मोठ-मोठी स्वप्नं दाखवून पाठवतात. एजंटद्वारे जो पगार सांगितला जातो त्या उलट पगार युवकांना मिळतो. त्याच बरोबर अतिशय दुय्यम दर्जाचे काम त्यांना करावे लागते. काय खरं आहेल्ल कंपनीद्वारे देण्यात येणारा व्हिजा आणि अॅग्रिमेंट भारतीय दूतावासाद्वारे अॅटेस्टेड असतो. त्यावर भारतीय दूतावासाचा शिक्कादेखील असतो.ल्ल अॅग्रिमेंटवर कामासंबंधी सर्व नियम व अटी लिहिलेल्या असतात. ल्ल अॅग्रिमेंट आणि व्हिजाची व्हॅलिडीटी १ ते ३ वर्षांची असते. यापेक्षा जास्त दिवस कर्मचाऱ्याला थांबवल्याचा त्याची माहिती भारतीय दूतावासाला देणे गरजेचे आहे. शहरात दलाल सक्रिय गल्फ कंट्रीजमध्ये काम मिळवून देणारे सर्वाधिक दलाल शहरात आहेत. दलालांनी जागोजागी आपले आॅफिसच सुरू केले आहे. त्यांच्याकडे काम करण्यासाठी एजंटदेखील येतात. या एजंटची नजर आपल्या भागातील मध्यमवर्गीय बेरोजगार युवकांवर असते. या दलालांचे नेटवर्क विदेशातदेखील कार्यरत असल्यामुळे त्यांचा संपर्क सतत होत असतो. उच्चपदाची नोकरीविदेशात पाठवण्याअगोदर या युवकांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंगदेखील देण्यात येते. हा सर्व दिखावा युवकांना खराखुरा वाटतो. दुबईमध्ये सुपरवायजरची नोकरी लावून देतो. मात्र, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील असे आमिष दलाल दाखवतात. टुरिस्ट व्हिजावर चालते कामबँकाक, सिंगापूर आणि थायलँडला पाठवणारे दलाल जास्त सक्रिय आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, या देशांमध्ये दलाल टुरिस्ट व्हिजावर लोकांना विदेशात पाठवतात. व्हिजाचा कालावधी संपेपर्यंत दलाल तेथील प्रशासनासोबत सेटिंग करतात. त्यानंतर भारतातून गेलेले नागरिक टुरिस्ट व्हिजावरच तेथे नोकरी करायला लागतात. नाशिक, दि. १५ - स्वप्नं जर कोणी दुसरे दाखवत असतील, तर त्याची तुटण्याची शक्यता जास्त असते. शहरातील काही युवकांसोबत असेच झाले आहे. विदेशात पाठवणारे दलाल त्यांना भक्कम पगार कमावणारा अधिकारी बनवण्याचे स्वप्न दाखवतात आणि विदेशात पाठवल्यास नोकर बनवतात. नाइलाजाने हे युवक मजुरी करायला लागतात; मात्र त्यांच्या स्वप्नावर विरजण पडते. हा सर्व खेळ विदेशात पाठवण्याच्या नावावर फ्रॉड करणाऱ्या दलालांमुळे होतो.
दलालांनी विनले स्वप्नांचे विदेशी जाळे व्हिजासाठी मोठी रक्कम
By admin | Published: October 15, 2014 11:15 PM