औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील विचुर प्रकाशा महामार्गावरील फाटयावर परतीच्या पावसाने मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे दररोज छोटेमोठेअपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने तरसाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी खड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी आंदोलन केले.े येथील विचुंर प्रकाशा महामार्गावर सटाणा ते विरगाव दरम्यान व तरसाळी फाटा येथील चौफुली येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, यारस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी चालते व खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज लहान मोठे अपघात होतात व अनेक नागरिक जखमी झाले आहेत, त्यामुळे गेल्या मिहण्यापासुन सटाणा बाधंकाम विभागाच्या वितने खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात न आल्याने आज सकाळी तरसाळी ग्रामपचांयतीचे मा.सरपंच लखन बापु पवार याच्यां नेत्रुत्वाखाली ग्रामस्थानी ही तरसाळी फाटा येथिल खड्डयात व्रुक्षारोपन करु न गांधीगिरी पध्दतिने आदोंलन करण्यात आले व येत्या आठ दिवसात खड्डे न बुजविल्यास बाधंकाम विभागाच्या कार्यालयासमोर तिव्र आदोंलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी प्रभाकर पवार, जगुबापु रौदंळ, साहेबराव रौदंळ, रमेश जाधव, पप्पु मोहन, राजेद्रं रौदंळ, किशोर जगताप, पप्पु रौदंळ, राजेद्रं मोहन, नदुं भारती, गणेश रौदंळ, उखाराम रौदंळ, तुषार रौदंळ, दिगबंर दळवी, आदीसह मोठ्यासख्येंने ग्रामस्थ उपस्थित होते..
महामार्गावरील फाटयावर परतीच्या पावसाने मोठे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 6:47 PM
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील विचुर प्रकाशा महामार्गावरील फाटयावर परतीच्या पावसाने मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे दररोज छोटेमोठेअपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने तरसाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी खड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी आंदोलन केले.
ठळक मुद्देतरसाळी : माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी केले खड्यात वृक्षारोप