रविवारची मुलाखतसंजय पाठक
नाशिक - शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली मृत्यूचा दर कमी होत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्यातुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...
जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असल्याने रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसले तरी त्यामुळे संबंधीत बाधीतांवर तत्काळ उपचार करता येतात तसेच त्या बाधीतापासून अन्य कोणाला होणारासंसर्ग रोखला जाऊ शकतो. शहरात गेल्या काही महिन्यात याच पध्दतीने काम सुरू असल्याने मृत्यू दर कमी होण्यास मदत होत आहे. नाशिक शहराचा मृत्यू पाच टक्के होता तो आता कमी होत आला आहे. राज्यातील कोरोना बाधीतांचामृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतका आहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे.
प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणात आण्यासाठी काय उपाय आहेत?
जाधव- शहरात चाचण्यांचे प्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत ९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेत या चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपच महत्वाची बाब आहे . आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजार अ?ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.
कायम पदे भरतीचा प्रस्तावमहाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजन बेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचण भासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयात टाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. डॉ. झाकीर हुसेन येथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कमर्चाऱ्यांची भरती केली जात असली तरी किमान मंजुर रिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविला आहे.आता पोलीसांबरोबर संयुक्त कारवाई
महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवस आहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. ही एकच सध्या उणिव आहे. अर्थात, संसर्ग कमी करतानाच नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यात आली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.