कळवण : तालुक्यातील राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या महामारीने हैराण असताना दुसरीकडे निसर्गावरही दुसऱ्या महामारीचा परिणाम दिसून येत आहे.कळवण तालुक्यात अनेक गावांनी जंगले राखली आहेत. या जंगलांमध्ये अनेक जातींची वृक्ष लागवड झाली आहे. तर काही ठिकाणी अनेक जुणे वृक्ष आहेत. मात्र शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतात पिकाची पेरणी केली नसल्याने लष्करी अळीने आपला मोर्चा राखीव जंगलातील हिरव्यागार वृक्षांकडे वळविला आहे.कनाशी - सापुतारा रस्त्यालगत असलेल्या जिरवाडा येथील डोंगरावरील साग व इतर झाडांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानेझाडांची पाने या अळीने फस्त केली आहे. वनविभागाने सदर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने मुख्य रस्त्यालगत असलेल्या डोंगरावरील वृक्षांची ही अवस्था असल्याने इतर ठिकाणी कल्पनाच न केलेली बरी अशी प्रतिक्रि या नागरिकांनी दिली आहे. वनविभागाने तात्काळ या महामारीला रोखून वनसंपदा वाचवावी, अशी मागणी कुºहाडबंदी करून या जंगलांचे संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया गावातील आदिवासी नागरिकांनी केली आहे.लष्करी अळीने खरिपाच्या पिकांसह जंगलातील साग व इतर झाडांची पानेही खाण्यास सुरु वात केली आहे. वनविभागाने गेल्या वर्षी लागवड केलेल्या जंगलातील झाडे वाचविण्यासाठी लष्करी अळीचा तात्काळ बंदोबस्त करावा.- मधुकर जाधव,माजी सभापती, पंचायत समितीराखीव जंगलातील वृक्षांवर अनेक प्रकारचे अळीसारखे जीव दरवर्षी निर्माण होतात. मात्र पावसाळा सुरू झाला की, या अळी खाली पडतात. कीटक व पक्ष्यांचे भक्ष होतात. वनविभागातर्फे वृक्षावरील अळीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करू.- राहुल घरटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कनाशी
जंगलातील वृक्षांवर अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:46 PM
राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या महामारीने हैराण असताना दुसरीकडे निसर्गावरही दुसऱ्या महामारीचा परिणाम दिसून येत आहे.
ठळक मुद्देहिरवी पाने फस्त : वनविभागाचे दुर्लक्ष; झाडे वाचविण्यासाठी नागरिक आक्रमक