लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी पाळलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत मारहाणीच्या प्रकार निंदनीय असून, शेतमालाचे लिलाव बंद करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही तसेच पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केली. याप्रसंगी अशोकराव होळकर, अजय ब्रह्मेचा, सचिन ब्रह्मेचा, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, गोकुळ पाटील, प्रवीण ताथेड, राजेंद्र चाफेकर, मधुकर गावडे, सचिन होळकर, अशोकराव गवळी, शेखर होळकर, रवींद्र होळकर, प्रफुल्ल भंडारी, कांतीलाल सुराणा, गुणवंत होळकर, नीलेश पटणी, संजय बिरार, सुरेश रेदासनी, शोभराज बागमार, डॉ.विकास चांदर, बाळासाहेब होळकर, ललित दरेकर, अरविंद होळकर, अनिल शेजवळ, अनिल भागवत, दिलीप पाटील, मंगेश गवळी, भय्या भंडारी, सागर थोरात, विजय जोशी, विलास देवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
लासलगाव बंद
By admin | Published: August 05, 2016 12:20 AM