लासलगाव : अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा हा उद्देश साधत मंगळवारी संध्याकाळी २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त गायत्री परिवाराकडून ३१०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाले होते यावेळी अनेकांना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही .यावेळी गायत्री देवी, प पु भगरीबाबा , वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडीत श्रीराम शर्मा आचार्य, वंदनीय भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गायत्री परिवाराने परिश्रम घेतले.गायत्री मंत्राची दीक्षा २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त हरिद्वार येथील शांतिकुंज येथून आलेले प्रग्यापुत्र मुख्य प्रवचनकार योगीराज बलकी यांचे संयोगी कमल चव्हाण, रामवीर नेगी, सर्वेश शर्मा, मनोज रावनकर यांच्याकडून येथील गायत्री परिवाराने पुसंवन (गर्भ) संस्कार केले त्यात १५ गर्भवती महिलांनी संस्कार करून घेत आपला सहभाग नोंदवला तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नामकरण संस्कार , विद्यारंभ संस्कार , अन्नप्राशन संस्कार ,व गायत्री मंत्र दीक्षा संस्कार करण्यात आले यानंतर २४ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या महापूर्णाहुतीचे समारोप करण्यात आला यात महिला व पुरु ष भक्तांनी मोठ्या संस्ख्येत हजेरी लावली.