शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

By admin | Published: September 10, 2014 9:55 PM

लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

 

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरु केलेल्या डाळींब लिलावास शेतकरी, आडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली. लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळींब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असल्याने त्यांची मालविक्रीची जवळपास सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे लासलगाव मुख्य बाजार आवारावर आठवड्याच्या दर सोमवार व बुधवार व शुक्रवार, शनिवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ अथवा आवक संपेपर्यंत डाळींबचा लिलाव सुरु केले आहेत. डाळींब उत्पादकांनी आपला शेतीमाल योग्य प्रकारे निवड करून एकसारखा डाळींब २० किलोच्या जाळीमध्ये विक्रीस आणल्यास त्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे. किटका, पिचका, लहान (अपरिपक्व), खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेटस्मध्ये विक्रीस आणल्यास त्यांची खरेदी करणारे व्यापारी येथे उपलब्ध असल्याने डाळींबाच्या प्रतीप्रमाणे शेतकरी बांधवाना बाजारभाव मिळत आहे. डाळींबाची विक्री उघड लिलावाद्वारे होत असून, स्थानिक अडत्यांबरोबर परप्रांतीय व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकऱ्यांना उच्चतम बाजारभाव मिळत आहे. लिलावानंतर लगेच चोख वजनमाप व रोख चुकवती तसेच अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत फक्त ५ टक्के आडत असल्याने शेतकऱ्यांची विक्री खर्चात बचत होत आहे. दि. २९ आॅगस्टपासून आजअखेर २०५१० जाळ्यामधून ४,१०२ क्विंटल डाळींबाची कमीत कमी १५१+ जास्तीत जास्त १,६०० रुपये व सरासरी ९०० रुपये प्रती जाळी या दराने विक्री झाली. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला डाळींब शेतीमाल प्रामुख्याने दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसह देशातील इतर बाजारपेठेत पाठविला जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळींबांची लागवड झाली असून, यंदा ३.१५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यातील नाशिकसह अहमदनगर, पुणे व सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. (वार्ताहर)