लॉकडाऊनमुळे लासलगाव आगारात उभ्या असलेल्या बसेस.लासलगाव : गेल्या १३ दिवसांपासून लासलगाव आगाराच्या लालपरीची चाके पूर्णत: थांबलेली असून कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या १३ दिवसांत एसटी महामंडळाच्या लासलगाव आगाराला जवळपास ६५ लाख रु पयांचा फटका बसला आहे.लासलगाव बस आगारातून दररोज २८८ फेऱ्यांद्वारे पंधरा हजार किलोमीटरचे धावत असून याद्वारे दररोज पाच लाख रु पयांचे उत्पन्न मिळत होते. १५ एप्रिलपर्यंत सेवा बंद राहणार आहे . नादुरु स्त बसेस व इतर कारणांमुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे . हे सर्व वास्तव असले तरी सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा बंद ठेवणे हा उत्तम पर्याय आहे . एसटी बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य नाही . सार्वजनिक आरोग्याचा विचार करता आर्थिक झळ सोसल्याशिवाय शासन तथा एसटी महामंडळाकडे कोणताही पर्याय सध्या उरलेला नाही .कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत . त्यामुळे गत १३ दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प झाली असून ६५ लाखांचे उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याची माहिती आगार प्रमुख शेळके यांनी दिली.
लासलगाव आगाराला ६५ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:54 PM
गेल्या १३ दिवसांपासून लासलगाव आगाराच्या लालपरीची चाके पूर्णत: थांबलेली असून कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या १३ दिवसांत एसटी महामंडळाच्या लासलगाव आगाराला जवळपास ६५ लाख रु पयांचा फटका बसला आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : महामंडळाच्या तोट्यात भर