लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधून शुक्रवारी (दि. ५) कोरोनाबाधित रु ग्ण ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली. यामुळे शहर आता कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.यावेळी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, निफाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे, निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. साहेबराव गावले उपस्थित होते. यावेळी फुलांचा वर्षाव करतटाळ्या वाजवून हे दोन्ही रुग्णांना शुभेच्छा देत त्यांना १४ दिवस होम क्वॉरण्टाइन राहणाच्या सूचना दिल्या.२७ मे रोजी लासलगाव येथील ५२ वर्षे वयाच्या पुरु षाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तसेच शिलापूर येथील रु ग्णासही डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांची सुरु वात ज्या लासलगाव शहरातून झाली त्याच शहरात पुन्हा रु ग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. लासलगाव शहर व परिसरातील गावात आतापर्यंत एकूण नऊ कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आले होते. या सर्व रु ग्णांवर यशस्वीपणे उपचार केल्यानंतर हे सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सर्वांची घरवापसी झाली आहे.
लासलगाव शहर कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:38 PM