शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लासलगाव : दारणाचे पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडण्याची मागणी

By admin | Published: February 26, 2016 11:04 PM

१६ गावांवर पाणीटंचाईचे सावट

लासलगाव : नांदुरमधमेश्वर धरणात लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेला ४ ते ५ दिवस पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा शिल्लक असून, योजनेवर अवलंबून असणाऱ्या सोळा गावांमध्ये निर्माण होणारी पिण्याच्या पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्याची मागणी सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांनीे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.या योजनेत लासलगाव व विंचूर ही मोठ्या लोकसंख्येची गावे येतात. त्यात बाजारपेठेमुळे पंचक्रोशीतून शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत असतो. जेणेकरून सोळा गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. निवेदनाच्या प्रति माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, निफाड तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहे. निवेदनावर लासलगाव सरपंच संगीता शेजवळ, विंचूरचे सरपंच शकुंतला दरेकर, टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे, निमगाव वाकडा उपसरपंच ललित दरेकर, ब्राह्मणगाव विंचूरच्या सरपंच भारती गवळी, पिंपळगाव नजीकचे सरपंच शांताराम घोडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)