लासलगाव..नुकत्याच प्राप्त अहवालांमध्ये निफाड तालुक्यात 10 कोरोना बाधित व्यक्ती आढळल्या आहेत.पिंपळगाव बसवंत एकूण सात व्यक्ती तर लासलगाव येथे 21वर्षीय पुरूषासह दोन दिवसापूर्वी सर्वे नंबर 93 मधील महीलेवर उपचार करणारे 34 वर्षीय डॉक्टरांचा देखील कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने लासलगाव येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.आतापर्यंत सात कोरोना रूग्णामुळे लासलगाव येथील जनतेला बराच त्रास सहन करावा लागला होता.सर्वे नंबर 93 मधील भागात दोन कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर भागात लोकांना गांभीर्याने न घेता मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र आज बुधवारी सकाळी कोरोनाग्रस्त महीलेवर उपचार करणारे खाजगी डॉक्टर देखील पॉझीटीव्ह आल्याचे समजताच आज दहा वाजेच्या सुमारास लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे ,पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे ,राजेंद्र पानसरे यांच्यासह पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद केलीलासलगाव येथे विनाकारण फिरणारांची मोठी संख्या असुन अनेक दुकानदारही मास्क न लावता येणारे ग्राहकांना माल देतात असे दिसुन आले.21 वर्षीय पुरु ष लासलगावलासलगाव येथील नुकत्याच कोरोना बाधित आढळलेल्या मिहलेच्या संपर्कात असल्याकारणाने पिंपळगाव बसवंत कोविंड सेंटर येथून घशाचा नमुना पाठवण्यात आला होता आज दिनांक 30 जून रोजी कोरोना बाधित अहवाल प्राप्?त झाला असुन63 वर्षे पुरु ष लासलगाव ( सोंमठाण देश,ता.येवला येथील इन्फ्लूएंजा सदृश्य असल्याकारणाने व जास्त त्रास होत असल्याकारणाने सामान्य रु ग्णालय नाशिक येथे दाखल होते तेथून त्यांचा घशाचा नमुना पाठवण्यात आला होता लासलगाव परिसराजवळ असल्या कारणाने पत्ता लासलगाव दिला होता अशी माहीती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे यांनी दिली.