सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेक दिवस बाजार समितीत लिलावच बंद होते. तरीदेखील लासलगाव बाजार समितीने चांगली कामगिरी करत १३१४ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. फक्त कांदा विक्रीतून बाजार समितीला ९३९ कोटी रुपयांचे थेट उत्पन्न मिळाल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंती असते. कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा,धान्य,भाजीपाला, टमाटा, डाळिंबसह आदी शेतमालाची उलाढाल वाढली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत तसेच शनिवारीदेखील कांदा लिलाव सुरू राहणार असल्याने यंदा बाजार समितीत उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
इन्फो
आवारही अपुरे ठरले
आशिया खंडातील सर्वांत नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. सर्वांत जास्त आवक व सरासरीमध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकऱ्यांमध्ये आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्य, भाजीपाला, टमाटा, डाळिंब आदी मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीचे आवारदेखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळत आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे.
030721\fb_img_1579780797916.jpg
सभापती सौ.सुवर्णा जगताप