शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लासलगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 1:53 PM

बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत डचके यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देआज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही

नाशिक : कृषी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज बंद आवाहनास येथील व्यवसायीक यांनी 100 टक्के व्यवसाय बंद ठेऊन पाठींबा व्यक्त केला. तसेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच रिक्षा, बससेवा बंद असल्याने  रस्त्यावर शुकशुकाट आहे. येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयस्फुर्तीने बंद ला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत निवेदन देऊन उद्यापासून पुर्ववत लिलाव सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन बाजार समितीत सुनील डचके यांना निवेदन दिले.ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एसटी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. आज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही.येथील नागरिकांनी कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दि.8 डिसेंबर रोजी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे या महाविकास आघाडीचे वतीने करण्यात आलेल्या आवाहनास येथील नागरिकांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन पाठींबा दिला.

येथे बंदच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद ठेवून शंभर टक्के पाठींबा दिला.त्यानंतर गुणवंत होळकर यांचे हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मिरान पठाण,डॉ विकास चांदर,  बबन शिंदे, संतोष राजोळे, रामनाथ शेजवळ, अनिल भागवत, विजय भंडारी, हर्षद शेख, दिनेश जाधव  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे व पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असुन केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवुन केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला शेती व्यवसायाला या मोठ्या उद्योगपतीच्या तालावर वाचविण्यासाठी सरकारने हे कायदे आणले आहे. देशभरातील शेतकरी संतप्त झाले आहे अशी माहिती जयदत्त होळकर यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंद